झेडपीतील मंजूर पदांच्या सुधारित आकृतीबंधासाठी समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झेडपीतील मंजूर पदांच्या सुधारित आकृतीबंधासाठी समिती
झेडपीतील मंजूर पदांच्या सुधारित आकृतीबंधासाठी समिती

झेडपीतील मंजूर पदांच्या सुधारित आकृतीबंधासाठी समिती

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील गट क आणि गट ड संवर्गातील मंजूर पदांचा सुधारित आकृतिबंध तयार केला जाणार आहे. हा सुधारित आकृतिबंध तयार करण्यासाठी ग्रामविकास विभागाने सात सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीत सहा जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एका उपायुक्तांचा समावेश केला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. समितीला सुधारित आकृतिबंध तयार करण्यासाठी येत्या १ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.
या समितीच्या अन्य सदस्यांमध्ये रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, नागपूरचे योगेश कुंभेजकर, वाशीम जिल्हा परिषदेच्या वसुमना पंत, नांदेडच्या वर्षा ठाकूर-घुगे, जळगावचे सीईओ पंकज आशिया या सहा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त (आस्थापन) सुरेश बेदमुथा हे या समितीचे सदस्य-सचिव आहेत.
ही समिती ११ फेब्रुवारी २०१६च्या ग्रामविकास विभागाच्या अध्यादेशातील तरतुदींचा अभ्यास करून, जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतिबंध तयार करणार आहे.