महाराष्ट्रातील स्टार्टअपची गरूडझेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रातील स्टार्टअपची गरूडझेप
महाराष्ट्रातील स्टार्टअपची गरूडझेप

महाराष्ट्रातील स्टार्टअपची गरूडझेप

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : उद्योगक्षेत्राला चालना देण्यासह तरुणांमधील नवसंकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहा’तील स्पर्धेत पुण्यातील पाच स्टार्टअप विजेते ठरले आहेत. यात देशभरातून एक हजारहून अधिक स्टार्टअप सहभागी झाले होते. त्यातून २४ विजेत्यांची नावे नुकतीच घोषित करण्यात आली असून त्यातील १३ स्टार्टअप एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

राज्य सरकारकडून महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे दरवर्षी आयोजन केले जाते. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. सप्ताहात देशभरातील कृषी, शिक्षण व कौशल्य, शासन, आरोग्य सेवा, स्मार्ट पायाभूत सुविधा, गतिशीलता, स्वच्छ ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन यासारख्या हजारहून अधिक स्टार्टअप्सनी नोंदणी केली होती. विजेत्या स्टार्टअपला राज्य सरकारच्या १५ लाख रुपयांच्या कामाच्या ऑर्डर मिळणार आहेत. सप्ताहात सरकार, उद्योग, शैक्षणिक, गुंतवणूकदार आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञ प्रतिनिधींचा समावेश असलेल्या पॅनेलसमोर आपल्या संकल्पना मांडण्यासाठी १०० स्टार्टअप्सची निवड करण्यात आली होती.

पुण्यातील विजेते स्टार्टअप :
एरेट बिझनेस सोल्यूशन्स :
एसएमई आणि कृषी वापरासाठी सोपी, जलद अंमलबजावणी आणि परवडणारे डिजिटल सोल्यूशन्स पुरविण्याचे काम हे स्टार्टअप करते.

खेतीबडी अॅग्रीटेक :
या स्टार्टअपचे तंत्रज्ञान शेतकरी, घरगुती उत्पादकांना त्यांचे उत्पादन विकण्याच्या प्रवासात मदत करते. शेतीचे आधुनिकीकरण करीत उत्पादकांचे उत्पन्न वाढविण्याचे स्टार्टअपचे ध्येय आहे.

स्पॅसीफाय मेडिकल टेक्नोलॉजी
ही एक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अपूर्ण क्लिनिकल गरजा सोडवणारी नावीन्यपूर्ण कंपनी आहोत. अभियांत्रिकी प्रक्रियेद्वारे उत्पादन तयार करण्यासाठी संकल्पना निर्माण करण्याचे काम हे स्टार्टअप करते.

इंडिक इन्स्पिरेशन्स
विविध कलांच्या माध्यमातून देशाचा सांस्कृतिक वारसा वाढविण्यात हे स्टार्टअप हातभार लावत आहे. नावीन्यपूर्ण कल्पना, अत्याधुनिक डिझाइन आणि देशातील कला, हस्तकलेचे आधुनिकीकरण हे स्टार्टअप करते.

लर्न ॲण्ड इम्पॉवर
कर्णबधिर मुलांना शिक्षण घेणे सोपे करून शिक्षण आकर्षक करण्याचे काम हे स्टार्टअप करते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कमी वेळात संकल्पना समजू शकतात.

राज्यातील विजेते स्टार्टअप
- एरेट बिझनेस सोल्यूशन्स, खेतीबडी अॅग्रीटेक, लर्न एंड इम्पॉवर, स्पॅसीफाय मेडिकल टेक्नोलॉजी, लर्न ॲण्ड इम्पॉवर, व्ह्रील फिनटेक सोल्यूशन्स, एजक्राफ्ट सोल्यूशन्स, स्याट एंटरप्राइझ एलएलपी, आयती डिव्हायसेस, निओडॉक्स, कॅटोनिक इंडिया, ऑमसॅट टेक्नॉलॉजीज, एक्सपोसम प्रा. लि.

स्टार्टअपची संख्या -
पुणे - ५
मुंबर्इ - ८