‘डेटा अॅनॅलिसिस’मध्ये घडवा करिअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डेटा अॅनॅलिसिस’मध्ये घडवा करिअर
‘डेटा अॅनॅलिसिस’मध्ये घडवा करिअर

‘डेटा अॅनॅलिसिस’मध्ये घडवा करिअर

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : डेटा अॅनॅलिटिक्स प्रक्रियेद्वारे वेगवेगळे टूल्स वापरून डेटा तयार केला जातो आणि त्याचे विश्लेषण केले जाते. या डेटाने मिळालेल्या इनसाइट व्यवसायाशी संबंधित निर्णय घेण्याच्या हेतूंसाठी वापरल्या जातात. कंपन्या आता अधिक तंत्रज्ञान-चालीत आणि वेगवान होत असल्याने, डेटा ॲनॅलिस्ट कर्मचाऱ्यांच्या शोधात आहेत. २०२२ मध्ये एकूण डेटा पूर्वीपेक्षा ५० पटीने अधिक होण्याचा अंदाज आहे. कंपन्यांना मोठ्या प्रमाणातील डेटाच्या उपलब्धतेसह अद्ययावत रहावे लागेल, जेणेकरून त्या स्पर्धेत मागे राहणार नाहीत. म्हणून डेटा ॲनॅलिसिसमध्ये पारंगत असलेले तज्ज्ञ कंपन्यांना उपलब्ध डेटा विश्लेषणानुसार त्यांचे व्यवसाय मॉडेल ॲडजस्ट करण्यासाठी आणि स्पर्धेच्या वातावरणात नेहमीच एक पाऊल पुढे राहण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. ‘डेटा अॅनॅलिसिस’ या आघाडीच्या क्षेत्रात करिअर घडविण्यास मदत करणारा अभ्यासक्रम एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ५१,००० रुपये.
अधिक माहितीसाठी संपर्क : ७३५०००१६०३.