वारसास्थळे, तीर्थक्षेत्राकडे पर्यटकांची ओढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारसास्थळे, तीर्थक्षेत्राकडे पर्यटकांची ओढ
वारसास्थळे, तीर्थक्षेत्राकडे पर्यटकांची ओढ

वारसास्थळे, तीर्थक्षेत्राकडे पर्यटकांची ओढ

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्याने पर्यटनस्थळे बहरू लागली आहेत. कोरोनामध्ये मागील दोन वर्ष घरात गेल्याने आता सांस्कृतिक वारसास्थळे, तीर्थक्षेत्र, साहसी जंगल सफारी, निवांत समुद्रकिनारे, मोहक पर्वतरांगा पाहण्यासाठी पर्यटकांची पावले वळाली आहेत.

गुलाबी थंडीची चाहूल लागल्यामुळे पर्यटक क्षणभर विश्रांती घेण्यासाठी आणि व्यस्त जीवनातून विरंगुळा घेण्यासाठी जात आहेत. त्यात दिवाळीच्या सुटीमुळे पर्यटन महामंडळानेही पर्यटकांसाठी काही सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे अष्टविनायकापासून ते शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर येथे दर्शन घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. भौतिक जीवनातील ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा यात टिकून राहण्यासाठी आध्यात्मिक शांती आधुनिक काळाची गरज आहे. धार्मिक पर्यटन या मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा ठरत असल्याचे मत पर्यटनक्षेत्रातील व्यावसायिकांनी मांडले.

जागतिक वारसास्थळांच्या सानिध्यात दीपोत्सव साजरा करण्याचा वेगळाच आनंद आहे. पर्यटकांना आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. पर्यटन मंत्रालयाने काही धार्मिक पर्यटनस्थळांच्या ऑनलाइन दर्शनाची सोय केली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन संकल्पना राबविण्यात येत आहेत.
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

पर्यटकांच्या अपेक्षा
सांस्कृतिक वारसा, वैभवशाली इतिहास, प्रेक्षणीय स्थळे महाराष्ट्रात आहेत. त्याचा प्रभावी वापर करून पर्यटनाच्या क्षेत्राचा विकास करणे शक्य आहे. धार्मिक ठिकाणाचे माहात्म्य, त्यामागचे शास्त्रीय कारणमीमांसा, त्यांच्या मनातील प्रत्येक प्रश्नाची तर्कसंगत उत्तरे मिळतील, अशी यंत्रणा विकसित करणे, ही काळाची गरज आहे. स्थानिक लोकांच्या आर्थिक विकासामध्ये धार्मिक पर्यटनाचा मोठा वाटा असेल. त्यासाठी त्या भागातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली पाहिजे. रस्ते, वीज, पाणी, निवास-भोजनाची सुविधा यात महत्त्वाची ठरते.

जागतिक वारसा स्थळे आणि किल्ले
अजंठा, वेरुळ, दौलताबाद, बिबी का मकबरा, राजगड, रायगड, जंजिरा, सिंधुदुर्ग
समुद्रकिनारे - गणपतीपुळे, दिवेआगर, वेळणेश्वर, हरीहरेश्वर, तारकर्ली
अभयारण्ये - ताडोबा, नवेगाव, चिखलदरा, राधानगरी
हिल स्टेशन - महाबळेश्वर, माथेरान, भंडारदरा, लोणावळा