‘अपना घर’मधील मुलींनी लुटला खरेदीचा आनंद तुळशीबाग गणपती मंडळाचा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अपना घर’मधील मुलींनी 
लुटला खरेदीचा आनंद
तुळशीबाग गणपती मंडळाचा उपक्रम
‘अपना घर’मधील मुलींनी लुटला खरेदीचा आनंद तुळशीबाग गणपती मंडळाचा उपक्रम

‘अपना घर’मधील मुलींनी लुटला खरेदीचा आनंद तुळशीबाग गणपती मंडळाचा उपक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः ‘मला लाल रंग फार आवडतो’..., ‘ए हा ड्रेस बघ किती छान आहे’.., ‘याची डिझाईन किती मस्त आहे’..., असे आपापसात कुजबुज करीत रंगीबेरंगी आकर्षक कपड्यांची स्वतःच्या पसंतीने पहिल्यांदाच खरेदी करताना मुलींच्या चेहऱ्यावर आनंद आणि कुतूहलाचे भाव दिसत होते. निमित्त होते, श्री तुळशीबाग गणपती मंडळातर्फे दिवाळीनिमित्त आयोजित उपक्रमाचे. यावेळी ‘अपना घर’मधील निराधार मुलींनी स्वतःच्या पसंतीने खरेदीचा आनंद लुटला.
तुळशीबागेत खरेदीचे आकर्षण सर्वांनाच असते. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने तुळशीबाग गणपती मंडळाने तुळशीबागेतील व्यापाऱ्यांच्या सहकार्याने या मुलींना खरेदीचा आनंद देण्याचा उपक्रम राबवला. सुरवातीला कुतूहलमिश्रित उत्सुकतेने भांबावून गेलेल्या मुली नंतर मात्र खरेदीत मनसोक्त रमल्या. टिकली, नेल पॉलीश, बांगड्या, नेकलेस, मेंदीचे कोन, हेअर पीन्स, कानातले, रुमाल, कपडे अशी मनसोक्त खरेदी त्यांनी केली. यावेळी विकास पवार, विनायक कदम, जितेंद्र अंबासनकर, विकास कुलकर्णी, दिलीप पर्वतीकर, अमर शहा, प्रकाश पवार, प्रदिप इंगळे, राजेश शिंदे उपस्थित होते. या उपक्रमास किरण गाला, सागर गुळुमकर, मोहन साखरीया, दत्ताभाऊ कावरे, सौरभ कदम, पुनेश शर्मा, कुशल पारेख, जितेंद्र अंबासनकर, चंद्रशेखर लुणीया आदींनी सहकार्य केले.
फोटो ः 00841