पुण्यातील २६ रेल्वे कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील २६ रेल्वे कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र
पुण्यातील २६ रेल्वे कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र

पुण्यातील २६ रेल्वे कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : केंद्र सरकार येत्या वर्षभरात देशात १० लाख नवीन नोकऱ्या देणार आहे. याच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यात पुणे रेल्वे विभागांत २६ कर्मचाऱ्यांना नवनियुक्तीपत्रे देण्यात आली. पुण्यातील ‘यशदा’ येथे शनिवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या वेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे उपस्थित होते.

या प्रसंगी सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये निवड झालेल्या युवकांना रोजगारासंबंधी नियुक्ती पत्रे देण्यात आली. या वेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रकाश जावडेकर, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे आदी उपस्थित होते.

नवनियुक्त कर्मचाऱ्यांची निवड रेल्वे भरती बोर्ड आणि रेल्वे रिक्रुटमेंट सेलद्वारे योग्य प्रक्रियेने करण्यात आली. या वेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेशकुमार सिंह यांनी सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांचे स्वागत व अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय कार्मिक अधिकारी जितेंद्र प्रताप सिंह यांनी केले. या वेळी वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक डॉ. राहुल पाटील, सहायक कार्मिक अधिकारी मच्छिंद्र, सुनील ठाकूर, पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांच्यासह मुख्य कल्याण निरीक्षक राकेशकुमार, सुप्रिया सावंत, रवींद्र लवळे आणि कार्यालय अधीक्षक गणेश शेट्टी आदी उपस्थित होते.