मुहूर्तावर चोपडी, वही खरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुहूर्तावर चोपडी, वही खरेदी
मुहूर्तावर चोपडी, वही खरेदी

मुहूर्तावर चोपडी, वही खरेदी

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः कपडे, फटाके आणि दिवाळीच्या खरेदीनंतर पुणेकरांनी रविवारी चोपडी, वही आणि संगणक खरेदीचा मुहूर्त साधला. मुख्य शहरातील रविवार पेठ, शुक्रवार पेठ आणि मंडईच्या बाजारपेठांत ग्राहकांनी गर्दी केली होती.
रविवारी सकाळी मुहूर्तावरील चोपडी, वही खरेदीबरोबरच लक्ष्मीपूजनाच्या साहित्याच्या खरेदीचा उत्साह बाजारपेठेत दिसून आला. व्यापाऱ्यांनी परंपरेप्रमाणे चोपडी, वही खरेदी केली, मात्र प्रत्यक्षात दैनंदिन वापरासाठी लॅपटॉप, संगणक खरेदीवर अधिक व्यापाऱ्यांचा कल दिसून आला. कारखानदार, उद्योजकांनी मुहूर्तावरच संगणक, चोपडी, वही खरेदी करीत असल्याचे बाजारपेठेत चित्र होते. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाचे साहित्य, मुर्ती, फुले आणि सजावटीच्या खरेदीचाही उत्साह दिसला. मात्र इतर दिवसांच्या तुलनेत रविवारी काहीशी गर्दी कमी होती. मुख्य बाजारपेठा वगळता शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवर तुलनेने खूप कमी गर्दी दिसत होती. त्यात भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना असल्याने बहुतेकांनी दुपारपर्यंत खरेदीसाठी बाहेर जाण्याचे टाळल्याचे रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीतून दिसून आले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही चोपडी आणि वही खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही १२० वर्षांपासून विक्री करत असल्याने आमच्या पारंपारिक ग्राहकांनी शनिवारी व रविवारी सकाळी चोपडीची खरेदी केली. यंदा २५ ते ३० टक्के भाव वाढले असून, परंपरा जपत नव्या पिढीनेही चोपडी खरेदीसाठी मुहूर्त साधला.
- मोईज चोपडावाला, शुक्रवार पेठ