स्वागत दिवाळी अंकांचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वागत दिवाळी अंकांचे
स्वागत दिवाळी अंकांचे

स्वागत दिवाळी अंकांचे

sakal_logo
By

ऋतुरंग

ऋतुरंगच्या दिवाळी अंकाचे यंदाचे ३० वे वर्ष आहे. ‘उद्या पहाटे दुसऱ्या वाटा’ हा यंदाचा विशेषांक असणार आहे. आपल्या अनोख्या वाटांवर चालताना यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या कथा अंकात वाचताना वाचकांना जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल हे नक्की. अंकात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, सत्यजित रे, दीप्ती नवल, मिंजल मुखिजा, रसिक रेड्डी, दुर्गा गुडिलू, सुरेखा कोरडे, शिवराम भंडारी या व अशा अनेक व्यक्तिरेखा उलगडल्या आहेत. मुखपृष्ठ दिलखेचक झाले असून, अंकातील विजयराज बोधनकर, अन्वर हुसेन, बी. जी. लिमये, राजू बाविस्कर यांच्या रेखाटन आणि मांडणीने कथेत जीव ओतला आहे. वैभव जोशी, मीनाक्षी पाटील, अपर्णा पाटील, अंजली अंबेकर, सुरेशचंद्र वारघडे, मल्हार अरणकल्ले, नीती मेहंदळे यांचे ललित लेखन उत्तम झाले आहेत.

- संपादक : अरुण शेवते, पृष्ठ : २९६, मूल्य : ३००

----------------------------


समतोल

स्त्रीशक्ती प्रबोधनाचे प्रयोजन, समाजासाठी असणारे त्यांचे विविध उपक्रम ‘समतोल’च्या माध्यमातून मांडण्यात येतात. यंदाच्या दिवाळी अंकातदेखील अशा विषयांना स्पर्श करण्यात आलेला आहे. मनोविकार तज्ज्ञ असणारे डॉ. अनिमिष चव्हाण यांचा भाषा कुणाची, राही पाटील यांचा ‘संवादकारण’वरील लेख, गौरी कानिटकर याचा शोध अनुरूप जोडीदाराचा हा लेख, नेहा पेंडसे यांचा आधुनिक कुटुंबावरील लेख, शिवराज वायचळ यांचा ‘कसा मी असा मी’ हे लेख उत्तम झाले आहेत. याशिवाय रामशास्त्री जिंकले ही विनायक धावले यांची कथा, तसेच अभिरुची ज्ञाते यांचा पुरुष नातेसंबंधांवर भाष्य करणारा लेख वाचनीय झाला आहे. स्पर्श कवितेचा यातील कविताही लयबद्ध रचलेल्या आहेत. अंकाचे मुखपृष्ठ आकर्षक झालेले आहे.

संपादिका : अनघा लवळेकर, पृष्ठ : ९६, मूल्य : १५०
----------