केजे इन्स्टिट्यूटच्या ७५४ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नोकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केजे इन्स्टिट्यूटच्या ७५४ पेक्षा
अधिक विद्यार्थ्यांना नोकरी
केजे इन्स्टिट्यूटच्या ७५४ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नोकरी

केजे इन्स्टिट्यूटच्या ७५४ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नोकरी

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचालित ट्रिनिटी ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे झालेल्या यंदाच्या कॅम्पस प्लेसमेंटमधून ७५४ हुन अधिक विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. निवड झालेल्यांपैकी दोन विद्यार्थ्यांना ३६ लाख रुपयांचे वार्षिक मानधन यूकेमधील नामांकित कंपनीमध्ये मिळाले.
महाविद्यालयातील अमेझॉन कंपनीने २६ लाख रुपयांचे वार्षिक मानधन विद्यार्थ्यांना दिले. तर ४७० हुन अधिक विद्यार्थ्यांना चार ते सात लाख रुपयांहून अधिकचे वार्षिक मानधन मिळाले आहे. अमेझॉन, आयबीएम, पर्सिस्टन्ट, कॅपजेमिनी, इन्फोसिस, सँडविक इंडिया, अशा नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. झेन्सार, बार्कलेज, रुबीकॉन, जीटीटी फाउंडेशन इत्यादी कंपन्यासोबत करार करून त्यांच्या औद्यागिक क्षेत्राची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात आले, अशी माहिती संचालक मेजर जनरल समीर कल्ला (निवृत्त) आणि प्राचार्य डॉ. नीलेश उके यांनी दिली.