शिक्षक कृतज्ञता कौतुक सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक कृतज्ञता
कौतुक सोहळा
शिक्षक कृतज्ञता कौतुक सोहळा

शिक्षक कृतज्ञता कौतुक सोहळा

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : मानधनावर कार्यरत शिक्षक-शिक्षिकांना ‘शिक्षक कृतज्ञता’ कौतुक सन्मान सोहळ्यात प्रत्येकी पाच हजार रुपये रोख, तीन किलो साखर आणि दोन किलो रवा अशी दिवाळी भेट देण्यात आली. शिक्षक भवन येथे ‘शिक्षक कृतज्ञता’ कौतुक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक हरी ओम मालशे यांनी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ही मदत दिली. अनेक शिक्षकांना आजही मानधनावर काम करावे लागते. त्यांची दिवाळी आनंदी होण्यासाठी विविध संस्थांच्या मदतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे मालशे यांनी सांगितले.

दलित पॅंथरतर्फे
मिठाई वाटप
पुणे : दलित पॅंथर युवक आघाडीच्या वतीने दिवाळीनिमित्त पुणे रेल्वे स्थानक, ससून रुग्णालय आणि साधू वासवानी चौक परिसरातील गरीब आणि गरजू नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, शहर युवक आघाडीचे अध्यक्ष राजेश गायगवळी यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली. नितीन दुबळे, अनिल सकट, मंदार वाघमारे, बालाजी गालफाडे आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

माँनिनी ट्रस्टतर्फे
वृद्धाश्रमात दिवाळी
पुणे : माँनिनी मानव सेवा ट्रस्टतर्फे वडकी नाला येथील ‘गंगा तारा’ वृद्धाश्रमातील गरीब गरजूंना दिवाळी फराळ, पणत्या, आकाशदीप वस्तूंचे वाटप करण्यात आले. सर्वांना आनंदात दिवाळी साजरी करता यावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वृद्धाश्रमाच्या संस्थापिका ॲड. लक्ष्मी माने, अध्यक्ष नीता भोसले, ट्रस्टच्या संगीता पिंगळे, दिलीप आबनावे, अल्ताफ पिरजादे, नेहा घुगे, तौसिफ बाबा, मयुरेश डहाके, जय नायर यांनी परिश्रम घेतले.

कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत दिवाळी साजरी
पुणे, ता. २५ : ध्वज फाउंडेशनतर्फे कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत दिवाळी भेट आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कसबा गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, ‘सकाळ’चे उपसंपादक मंदार कुलकर्णी, ध्वज फाउंडेशनचे अध्यक्ष शिरीष थिटे, ‘बिग ॲट हार्ट’ संस्थेच्या नलिनी थिटे आदी या वेळी उपस्थित होते.

शिवसाई युथ फाउंडेशनतर्फे दीपोत्सव
पुणे : कोथरूड येथील शिवसाई युथ फाउंडेशनतर्फे ‘दीपोत्सव २०२२- एक दिवस सामाजिक बांधिलकीचा’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. ममता फाउंडेशन येथील सर्व मुलांना दिवाळी फराळ देऊन त्यांच्यासोबत दीपोत्सव साजरा करण्यात आला. फाउंडेशनचे दर्शन पगडे, ओंकार जाधव, संकेत पवार, अनिकेत सरकटे, सौरभ खरात, प्रणव घाडगे, नीरज कुटेकर उपस्थित होते.
शिवसाई युथ फाउंडेशनचे अध्यक्ष साईराज पगडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.