पथदिव्यांच्या थकबाकीपोटी महावितरणला मिळणार ५१ कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पथदिव्यांच्या थकबाकीपोटी महावितरणला मिळणार ५१ कोटी
पथदिव्यांच्या थकबाकीपोटी महावितरणला मिळणार ५१ कोटी

पथदिव्यांच्या थकबाकीपोटी महावितरणला मिळणार ५१ कोटी

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे थकीत असलेल्या रस्त्यावरील दिव्यांच्या विजेच्या देयकांच्या एकूण थकबाकीपैकी ५१ कोटी ६४ लाख ६ हजार १३८ रुपयांची रक्कम ही थेट महावितरणकडे वर्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महावितरणला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे एकूण २६३ कोटी रुपयांची विजेच्या देयकांची थकबाकी आहे. ही थकबाकी जिल्हा परिषदेकडे वर्ग न करता, थेट महावितरण कंपनीकडे वर्ग करण्याची मागणी महावितरण कंपनीने राज्य सरकारकडे केली होती. त्यांची ही मागणी सरकारने मान्य केली आहे.

यानुसार महावितरणला सध्या किती रक्कम देणे अपेक्षित आहे, याची माहिती राज्य सरकारने जिल्हा परिषदेकडून मागविली होती. यानुसार जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतनिहाय किती रक्कम समायोजित करावी, याची सविस्तर यादी राज्य सरकारला पाठविली आहे. गाव पातळीवरील विजेच्या वापरापोटी आकारले जाणाऱ्या वीज देयकांची रक्कम ही कधी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून तर कधी राज्य सरकारडून महावितरणला वितरित केली जाते.

प्रचलित पद्धतीनुसार रस्त्यांवरील दिव्यांच्या देयकापोटी राज्य सरकारकडून वितरित केली जाणारी रक्कम ही पहिल्यांदा जिल्हा परिषदेकडे वर्ग केली जाते.त्यानंतर जिल्हा परिषदेकडून महावितरण कंपनीला दिली जाते. मात्र ही प्रक्रिया मोठी वेळखाऊ आहे. त्यामुळे राज्य सरकारने विजेच्या देयकांची रक्कम ही जिल्हा परिषदेकडे वर्ग न करता, ती थेट महावितरण कंपनीकडे वर्ग करावी, अशी मागणी एका पत्राद्वारे राज्य सरकारकडे केली होती. ती मागणी सरकारने मान्य केली आहे. यामुळे महावितरणला मोठा दिलासा मिळाला आहे.