तोतया पत्रकारांनी व्यावसायिकांकडून उकळली खंडणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोतया पत्रकारांनी व्यावसायिकांकडून उकळली खंडणी
तोतया पत्रकारांनी व्यावसायिकांकडून उकळली खंडणी

तोतया पत्रकारांनी व्यावसायिकांकडून उकळली खंडणी

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : व्यावसायिकाला दमदाटी करीत खून करण्याची धमकी देत तोतया पत्रकारांनी ५ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात एका महिलेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद, मंगेश तांबे, योगेश नागपुरे, लक्ष्मणसिंग तंवर यांच्यासह एका महिलेविरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय व्यावसायिकाने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. त्यांचे केशवनगर येथे दुकान आहे. रविवारी (ता. २३) सायंकाळी ६ वाजता फिर्यादीच्या केशवनगरमधील दत्त कॉलनी येथील गोडाऊनमध्ये प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद, मंगेश तांबे, योगेश नागपुरे, लक्ष्मणसिंग तंवर हे आले. साळुंखे याने आपण एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिक व आत्मज्योती वृत्तपत्राचे पत्रकार असल्याचे सांगितले. त्यानंतर ‘‘गोडाऊनमध्ये भेसळयुक्त मालाची विक्री करून दोन नंबरचा व्यवसाय करता, यापूर्वीही गुटखा विकून तुम्ही भरपूर पैसा कमाविला आहे. आता पेपरमध्ये तुमची बातमी लावून तुमची बदनामी करतो. पैसे न दिल्यास संपूर्ण खानदान संपवून टाकतो’’ अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीच्या मुलास मारहाण केली, तसेच त्यांच्या मुलाला व पत्नीला गोडाऊनमध्ये कोंडून ठेवले. साळुंखे याने स्वतःसाठी, त्याच्या साथीदारांसाठी व आत्मज्योती या वृत्तपत्रात कार्यरत असलेल्या महिलेसाठी फिर्यादीकडून ५ लाख रुपयांची खंडणी उकळली. या घटनेनंतर फिर्यादीनी पोलिस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.