शहरात मोबाइल, रोकड चोरीच्या घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात मोबाइल, रोकड चोरीच्या घटना
शहरात मोबाइल, रोकड चोरीच्या घटना

शहरात मोबाइल, रोकड चोरीच्या घटना

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः शहराच्या वेगवेगळ्या भागात चोरीच्या घटना घडल्या असून, बुधवार पेठेत तरुणाला धमकावून चोरट्यांनी मोबाइल हिसकावून नेला, तर चंदननगर परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून चोरट्यांनी त्यांच्याकडील साडेतीन हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी नरेंद्र बुद्धीसिंह (वय २७, रा. साडेसतरानळी, हडपसर) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र व त्याचा मित्र मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठ परिसरातून हडपसर येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. तत्पूर्वी ते बुधवार पेठेतील क्रांती चौकातून पायी जात होते. त्या वेळी त्यांना दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी अडविले. चोरट्यांनी नरेंद्र व त्याच्या मित्राला मारहाण करून १५ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला. दरम्यान, चंदननगर भागात चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून त्याच्याकडील साडेतीन हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली. विजय भास्कर गायकवाड (वय २१), विकास रमेश गायकवाड (वय २५, दोघेही रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.