डीआरडीओतर्फे १३ उद्योगांसोबत करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीआरडीओतर्फे १३ उद्योगांसोबत करार
डीआरडीओतर्फे १३ उद्योगांसोबत करार

डीआरडीओतर्फे १३ उद्योगांसोबत करार

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वतीने सशस्त्र दलांसाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्राला स्वदेशी उत्पादने पुरविण्यात येत असून यामध्ये देशातील उद्योग आणि स्टार्टअप महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. दरम्यान नुकतेच डीआरडीओतर्फे १० स्वदेशी तंत्रज्ञान खासगी उद्योगांना हस्तांतरित केले आहे.
डीआरडीओद्वारे १३ खासगी उद्योगांना तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यासाठी करार केला आहे. हे कारार नुकतेच ‘बंधन’ या संमारंभात पार पडले. यंदा झालेल्या डिफेन्स एक्स्पोमध्ये देशातील अनेक उद्योगांनी सहभाग घेत संरक्षण क्षेत्रासाठी विकसित केलेल्या प्रणाली व उत्पादनांचे प्रदर्शन भरविले होते. या उत्पादनांची पाहणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली होती. त्यानुसार काही निवडक उद्योग आणि डीआरडीओमध्ये करार करण्यात आला आहे. या डिफेन्स एक्स्पोमध्ये डीआरडीओद्वारे एकूण ४५१ सामंजस्य करार करण्यात आले होते.
इलेक्ट्रॉनिक्स, लेसर तंत्रज्ञान, शस्त्रास्त्रे, भौतिक विज्ञान, लढाऊ वाहने, नौदल प्रणाली आणि सेन्सर्स आदींचे तंत्रज्ञान या उद्योगांना हस्तांतरित केले आहे. यामध्ये मिश्र धातुंसाठी सेमी-सॉलिड मेटल प्रक्रिया तंत्रज्ञान, लढाऊ वाहनांकरिता न्यूक्लिअर शिल्डिंड पॅड, १२० एमएम टँडम वॉरहेड सिस्टम, लेझर आधारित फ्यूज, बीडीओसी, उच्च दर्जा सामग्री, अनएक्सप्लोडेड ऑर्डनन्स हँडलिंग रोबोट, हँडहेल्ड ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार आदींचा समावेश आहे.