अकरावीच्या ३३ हजार जागा रिक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावीच्या ३३ हजार जागा रिक्त
अकरावीच्या ३३ हजार जागा रिक्त

अकरावीच्या ३३ हजार जागा रिक्त

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांमधील तब्बल ३३ हजार ६६ जागा अद्याप रिक्त असल्याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३१९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एक लाख ११ हजार ९९० जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. या जागांवरील प्रवेशासाठी एकूण एक लाख सात हजार ९५३ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नावनोंदणी केली होती. त्यातील ९५ हजार ४१९ विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित असून प्रवेशाच्या सर्व फेऱ्यांमधून केवळ ७८ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अद्याप १६ हजार ४९५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याचे निदर्शनास आले आहे.
राज्यात आतापर्यंत सुमारे चार लाख १९ हजार २२९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर प्रवेशाची प्रक्रिया संपत असतानाही एक लाख ६६ हजार ४२६ जागा रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या, तीन विशेष फेऱ्या आणि २६ सप्टेंबरपासून ते २१ ऑक्टोबरपर्यंत दैनंदिन गुणवत्ता विशेष फेऱ्यांचे आयोजन केले होते. तरीही आणखी काही निवडक विद्यार्थी प्रवेशासाठी प्रतीक्षेत आहेत.

अकरावीच्या प्रवेशाचा आढावा
महापालिका क्षेत्र : महाविद्यालयांची संख्या : प्रवेश क्षमता : प्रमाणित अर्ज : घेतलेला प्रवेश : रिक्त जागा : प्रवेश न घेतले
पुणे आणि पिंपरी-चिंचवड : ३१९ : १,११,९९० : ९५,४१९ : ७८,९२४ : ३३,०६६ : १६,४९५
मुंबई : १,०१६ : ३,७५,१९५ : ३,०५,४३५ : २,७६,११९ : ९९,०७६ : २९,३१६
नागपूर : २०४ : ५५,८०० : ३९,८१८ : ३४,८८६ : २०,९१४ : ४,९३२
नाशिक : ६३ : २६,४८० : २५,६९३ : १८,६७६ : ७,८०४ : ७,०१७
अमरावती : ६५ : १६,१९० : १२,६०२ : १०,६२४ : ५,५६६ : १,९७८

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये कोट्याअंतर्गत झालेले प्रवेश
कोटा : प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : रिक्त जागा
इनहाऊस : ४,६५५ : १,८३५
अल्पसंख्याक : ३,३८५ : १,९९२
व्यवस्थापन : २,१८० : १,५०८
एकूण : १०,२२० : ५,३३५