मित्राचा वाढदिवस करुन घरी परतणाऱ्या मित्रांच्या कारचा अपघात, एकाचा मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident
मोटारीची दुभाजकाला धडक; एकाचा मृत्यू, पाच जखमी

मित्राचा वाढदिवस करुन घरी परतणाऱ्या मित्रांच्या कारचा अपघात, एकाचा मृत्यु

पुणे - मित्राचा वाढदिवस करुन मध्यरात्री घरी परतताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातामध्ये एका तरुणाच मृत्यु झाला. दुसरा तरुण जखमी आहे, तर अन्य चौघेजण किरकोळ जखमी झाले आहे. हि घटना सोमवारी रात्री (ता.24) साडे बारा वाजण्याच्या सुमारास होळकर पुलाजवळ घडली.

अमित रघुनाथ ढमढेरे (वय 31, रा. वडगाव शेरी) असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अमितचे वडील रघुनाथ ढमढेरे (वय 58) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमित, त्याचा मित्र अभिषेक गायकवाड व अन्य चौघे असे एकूण सहाजण सोमवारी रात्री त्यांच्या मित्राच्या वाढदिवसासाठी गेले होते. वाढदिवस झाल्यानंतर ते सर्वजण एकाच कारमधून खडकी येथील मुळा रस्त्याने वडगाव शेरी येथील त्यांच्या घरी येत होते. अभिषेक हा कार चालवित होता.

दरम्यान, कार भरधाव असल्याने होळकर पुलाजवळील चंद्रमा चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावरील बॉम्बे इंजिनीअरींग ग्रुप(बीईजी) बसथांब्यासमोर अभिषेकचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यात असणाऱ्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर कार पलटी झाल्याने सहा जणांनाही दुखापत झाली. अमित हा डाव्या बाजुला बसलेला असल्याने त्याच्या हाताला व डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. तसेच अभिषेक यालाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अमितचा उपचारांपुर्वी अमितचा मृत्यु झाला.अन्य चौघेजण किरकोळ जखमी आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सत्यवान गेंड करीत आहेत.

टॅग्स :puneaccidentdeathcar