सैन्यदलाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुलाखतीच्या तारखा निवडण्याची प्रक्रिया सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सैन्यदलाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुलाखतीच्या तारखा निवडण्याची प्रक्रिया सुरू
सैन्यदलाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुलाखतीच्या तारखा निवडण्याची प्रक्रिया सुरू

सैन्यदलाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुलाखतीच्या तारखा निवडण्याची प्रक्रिया सुरू

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : सैन्यदलाच्या ‘शार्ट सर्व्हिस कमिशन’च्या (एसएससीडबल्यू) ३१ व्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सैन्यदालाद्वारे कट ऑफ जाहीर केला आहे. महिला उमेदवारांसाठी असलेल्या या प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत असून त्यामध्ये सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) मुलाखतीसाठी तारखा निवडण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे. तर पात्र ठरलेल्या महिला उमेदवारांना येत्या सोमवारपर्यंत (ता. ३१) तारखा निवडता येणार आहेत.
सैन्यदलाच्या तांत्रिक विभागासाठी एसएससीडबल्यूच्या ३१ व्या तुकडीचे प्रशिक्षण पुढील वर्षी एप्रिल २०२३ पासून सुरू होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत लेखी परीक्षा नसून थेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. त्यासाठी अभियांत्रिकीची पदवी असलेल्या महिला उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. त्यानुसार विविध शाखांसाठी कट ऑफ जाहीर केला आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता एसएसबीसाठी तारखा निवडण्याच्या सूचना दिल्या आहेत. एसएसबी प्रक्रिया उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना चेन्नई येथील ‘ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी’ (ओटीए) येथे पुढील प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवार सैन्यदलात अधिकारी म्हणून रुजू होतील. एसएसबीच्या तारखा निवडण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून उमेदवारांना www.www.joinindianarmy.nic.in सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल. यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे.