संगमवाडी येथे स्मारकपूर्व कामांचा प्रारंभ क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारक समितीतर्फे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमवाडी येथे स्मारकपूर्व कामांचा प्रारंभ
क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारक समितीतर्फे आयोजन
संगमवाडी येथे स्मारकपूर्व कामांचा प्रारंभ क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारक समितीतर्फे आयोजन

संगमवाडी येथे स्मारकपूर्व कामांचा प्रारंभ क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारक समितीतर्फे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : संगमवाडी येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारकाची सीमाभिंत रस्ता, साफसफाई, सुरक्षाव्यवस्था आदी स्मारकपूर्व कामांचा प्रारंभ दिवाळी पाडव्याच्या दिवशी करण्यात आला. क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मातंग समाजाने अनेक वर्षे लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधी स्थळाच्या उभारणीसाठी संघर्ष केला. डाकले यांनी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर याबाबत सरकारकडे पाठपुरावा केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारकाबाबतचा निर्णय झाला. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने स्मारकाच्या भूसंपादनासाठी ८८ कोटींचा निधी महापालिकेस दिला. त्यातून जागेचे भूसंपादन शक्य झाल्यामुळे भूमिपूजन होऊ शकले. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते स्मारकपूर्व कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

माजी गृहराज्यमंत्री बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जगताप यांनी समितीचे अध्यक्ष डाकले, समिती सदस्य बाळासाहेब भांडे, रवी पाटोळे, राम कसबे, डॉ. राजू अडागळे, शांतिलाल मिसाळ यांचे याबद्दल कौतुक केले. अनिल हातागळे, राजू साने, आरपीआय युवकाध्यक्ष वीरेन साठे, सचिन डाकले, अक्षय शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.