दारू पिण्यास मनाई केल्याने टोळक्याकडून व्यावसायिकावर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारू पिण्यास मनाई केल्याने 
टोळक्याकडून व्यावसायिकावर हल्ला
दारू पिण्यास मनाई केल्याने टोळक्याकडून व्यावसायिकावर हल्ला

दारू पिण्यास मनाई केल्याने टोळक्याकडून व्यावसायिकावर हल्ला

sakal_logo
By

पुणे : गोदामाच्या पायरीवर बसून दारू पीत असलेल्यांना हटकवले म्हणून टोळक्याने एका व्यावसायिकावर हल्ला करून दहशत माजविल्याची घटना धनकवडीतील आंबेगाव पठार भागात घडली. टोळक्याने दोन वाहनांच्या काचा फोडल्या. या प्रकरणी पाच जणांना अटक केली.
शमशुद्दीन नजीर जंबुवाले (वय ३८, रा. थोरात कॉलनी, कर्वेनगर), शंकर भारत बिरामणे (वय २५), आकाश रामलू चव्हाण (वय १९), मिथुन भरत बिरामणे (वय २६, तिघे रा. अष्टविनायक नगर, साईसिद्धी चौक, आंबेगाव पठार, धनकवडी), साहिल दीपक पाटील (वय १८, रा. नवनाथनगर, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात सचिन धनकवडे (वय ३६, रा. पाटीलनगर, धनकवडी) जखमी झाले आहेत. धनकवडे यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आंबेगाव पठार परिसरात धनकवडे यांचे गोदाम आहे. आरोपी गोदामाच्या पायरीवर रात्री दारू पीत होते. त्या वेळी धनकवडे यांनी दिवाळीच्या दिवशी दारू पिऊ नका, असे सांगितले. त्यानंतर टोळक्याने धनकवडे यांच्या डोक्यात बिअरची बाटली मारली. टोळक्याने कोयता उगारून दहशत माजविली. धनकवडे यांच्या इमारतीतील भाडेकरू रतनलाल जोशी यांच्या टेम्पोची तोडफोड केली. डॉ. विनोद जोशी यांच्या वाहनाचे काच फोडली. धनकवडे यांची बहीण आणि मोठ्या भावास शिवीगाळ करून दहशत माजविली. पसार झालेल्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.