जिल्ह्यातील २४७ गावांमध्ये बॅंक खात्यासाठी आज मेळावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील २४७ गावांमध्ये 
बॅंक खात्यासाठी आज मेळावे
जिल्ह्यातील २४७ गावांमध्ये बॅंक खात्यासाठी आज मेळावे

जिल्ह्यातील २४७ गावांमध्ये बॅंक खात्यासाठी आज मेळावे

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे बॅंकेत खाते उघडण्यासाठी शनिवारी (ता. २९) २४७ गावांमध्ये खास मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांमध्ये खाते उघडण्याबरोबरच किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत शेतीपूरक व्यावसायासाठी आणि मुद्रा योजनेंतर्गत व्यावसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्यावतीने जिल्ह्यात आर्थिक समावेशनातून सशक्तीकरण या प्रकल्पाची अंमलबजावणी खास मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे जिल्हा अग्रणी बँक व जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, सहकारी व ग्रामीण बँकांच्या माध्यमातून या खास मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्रीकांत कारेगांवकर यांनी दिली.
जिल्ह्यातील सुमारे २१ बँका, जिल्हा परिषद व राज्य सरकारच्या महसूल, पशुसंवर्धन, कृषी, मत्स्य आदी विभाग आणि गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या, कृषी सहाय्यक या मेळावा आयोजनाच्या मोहिमेत सहभागी होणार आहेत. या मोहिमेअंतर्गत पंतप्रधान जनधन बचत खाते उघडणे आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यासाठीच्या विविध योजनांमध्ये नागरिकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पीक कर्जाबरोबरच दुग्ध, पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन व मत्स्यव्यवसाय आदी शेतीपूरक व्यवसायांसाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी आणि मुद्रा योजनेअंतर्गत बेरोजगार व महिला बचत गटांना खेळते भांडवल व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीचे अर्ज स्वीकारले जाणार असल्याचेही कारेगांवकर यांनी सांगितले.

नोव्हेंबर महिन्यात होणारे मेळावे (संख्या)
- ५ नोव्हेंबर --- २१५ गावे
- १२ नोव्हेंबर --- १८९ गावे
- १९ --- १८२ गावे
- २६ नोव्हेंबर --- १७६ गावे