फॅशन स्ट्रीट परिसरात चार लाखांचे दागिने लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फॅशन स्ट्रीट परिसरात चार लाखांचे दागिने लंपास
फॅशन स्ट्रीट परिसरात चार लाखांचे दागिने लंपास

फॅशन स्ट्रीट परिसरात चार लाखांचे दागिने लंपास

sakal_logo
By

पुणे : लष्कर भागातील फॅशन स्ट्रीट परिसरात खरेदीसाठी गेलेल्या एकाच्या बॅगमधून चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना बुधवारी (ता. २६) घडली. याबाबत आदीत सांगवी (वय २८, रा. लुल्लानगर, कोंढवा) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार लष्कर भागातील फॅशन स्ट्रीट परिसरात खरेदीसाठी गेले होते. फॅशन स्ट्रीट परिसरात खरेदीसाठी गर्दी होती. चोरट्यांनी सांगवी यांच्या बँगमधून तीन लाख ९५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरले. सहायक पोलिस निरीक्षक शीतल जाधव या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.