खुनाचा प्रयत्न; दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खुनाचा प्रयत्न; दोघांना अटक
खुनाचा प्रयत्न; दोघांना अटक

खुनाचा प्रयत्न; दोघांना अटक

sakal_logo
By

पुणे : घरात डोकावून पाहिल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी (ता.२८) वारजे भागात घडली. या प्रकरणी दोघांना अटक केली. आकाश सतीश जगताप (वय २०) आणि सुनील चंद्रकांत शिंदे (वय २२, दोघे रा. रामनगर, वारजे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. किरण घरडे (वय ४२, रा. रामनगर, वारजे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. घरडे यांनी याबाबत वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घरडे यांच्या खुनाचा प्रयत्न तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.