तनिष्का करतेय ब्लड कॅन्सरशी दोन हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तनिष्का करतेय 
ब्लड कॅन्सरशी दोन हात
तनिष्का करतेय ब्लड कॅन्सरशी दोन हात

तनिष्का करतेय ब्लड कॅन्सरशी दोन हात

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः अवघ्या दहा वर्षांची तनिष्का रक्ताच्या कर्करोगाने (ब्लड कॅन्सर) ग्रस्त असून, गेली अनेक दिवस कर्करोगाशी दोन हात करत आहे. कसबा पेठेतील संदीप कोंडे यांची ही चिमुरडी सध्या केईएम रुग्णालयात उपचार घेत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही कोंडे यांनी आजवरचे उपचारांना कोणतीही कमी भासवून दिली नाही. आता तनिष्काच्या कर्करोगाने गंभीर स्वरूप धारण केले असून, उपचारांसाठी डॉक्टरांनी केमोथेरमीचा पर्याय सुचविला आहे. या उपचारासाठी कोंडे यांना दहा लाख रुपयांची गरज आहे. मात्र, आर्थिक आघाडीवर खंगलेले संदीप यांना हे उपचार करणे अशक्यप्राय होऊन बसले असून, त्यांना आता आर्थिक मदतीची गरज आहे. तनिष्काला या आजारातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बॅंकेचा तपशील
बॅंक ऑफ महाराष्ट्र (कसबा)
खातेदाराचे नाव ः आरती संदीप कोंडे
खाते क्रमांक ः ६०३७३२०६८५१
आयएफएससी क्रमांक ः MAHB0000322
मोबाईल क्रमांक ः ८७८८२८७१३६ किंवा ७२४९८५९६८९