व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी गजा मारणेला न्यायालयीन कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी 
गजा मारणेला न्यायालयीन कोठडी
व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी गजा मारणेला न्यायालयीन कोठडी

व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी गजा मारणेला न्यायालयीन कोठडी

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : शेअर दलालाचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबीयांकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह दोघांना मोका न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने एकत्रित तपास करण्यासाठी पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.

कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरूड) आणि मयूर जगदीश जगदाळे (वय ३१, रा. होळकरनगर, आंबेगाव पठार) असे न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने मारणेला १६ ऑक्टोबर रोजी साताऱ्यातील वाई परिसरातून ताब्यात घेतले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयाने त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत मोका कोठडी सुनावली होती. या गुन्ह्यात मारणेसह सचिन ऊर्फ पप्पू दत्तात्रेय घोलप (रा. गोविंदराव पाटीलनगर, धनकवडी), हेमंत ऊर्फ बालाजी पाटील (रा. बुरली, ता. पलूस, जि. सांगली), फिरोज महंमद शेख (रा. समर्थनगर, कोडोली, सातारा), सराईत गुन्हेगार डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर (वय ५६, रा. कोल्हापूर), अजय बबन गोळे (वय २८), मयूर राजेंद्र निवंगुणे (वय २४, दोघेही रा. नऱ्हे) आणि प्रसाद बापू खंडाळे (वय २९, रा. पद्मावती) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी ३८ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. आरोपींच्यावतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला.