दलित पॅंथरतर्फे गरजूंना श्रीखंड, दूध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दलित पॅंथरतर्फे गरजूंना श्रीखंड, दूध
दलित पॅंथरतर्फे गरजूंना श्रीखंड, दूध

दलित पॅंथरतर्फे गरजूंना श्रीखंड, दूध

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : शहरातील फुटपाथवर राहणाऱ्या गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने दलित पॅंथरच्यावतीने पुणे स्टेशन परिसरातील फुटपाथवर राहणाऱ्या गरजूंना पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनावणे यांच्या हस्ते दूध व श्रीखंडाचे वाटप करण्यात आले. या वेळी पॅंथरचे पुणे शहर युवकाध्यक्ष राजेश गायगवळी, कार्याध्यक्ष सुमंगल बांबोळे, वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष विजय तेलोरे, अनिल सकट, नितीन दुबळे, अरविंद गायकवाड, अर्जुन काते आदी उपस्थित होते.