सम्यक पुरस्कारांचे रविवारी वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सम्यक पुरस्कारांचे रविवारी वितरण
सम्यक पुरस्कारांचे रविवारी वितरण

सम्यक पुरस्कारांचे रविवारी वितरण

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : समाजपरिवर्तनाच्या कार्यात भरीव योगदान देणाऱ्या बारा व्यक्तींना ‘सम्यक पुरस्कार २०२२’ देऊन रविवारी पुण्यात गौरविण्यात येणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा मंदिर येथे ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन फुले-आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठान, मातंग युवा परिषद आणि सम्यक पुरस्कार वितरण समिती यांनी केले आहे. नाथाभाऊ भोसले, रोहिदास गायकवाड, अशोक पगारे, रामदास साळवे, मिलिंद गायकवाड, अभय भोर, राहुल डंबाळे, जावेद खान, पंकज धिवार, अविनाश कांबळे, दीपक गुजर, सोमनाथ डाके यांचा ‘सम्यक पुरस्कार २०२२’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. संयोजक मिलिंद अहिरे, संजय आल्हाट आणि नागेश भारत भोसले यांनी ही माहिती दिली.