कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराविषयी प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराविषयी प्रशिक्षण
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराविषयी प्रशिक्षण

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराविषयी प्रशिक्षण

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : लघु उद्योग, नवउद्यमींना कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मराठा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयाचे प्राध्यापक डॉ. अजित जावकर या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. एक नोव्हेंबर रोजी एमसीसीआयए ट्रेड टॉवरमधील सुमंत मुळगावकर ऑडिटोरियममध्ये प्रशिक्षण पार पडेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचीची संकल्पना, लघु आणि मध्यम उद्योग, नवउद्यमींनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याविषयीची रणनीती आणि त्याचा उद्योगांच्या दैनंदिन व्यवहारात वापर करून स्पर्धात्मकता टिकवण्याबाबतचे मार्गदर्शन या प्रशिक्षण शिबिरात केले जाईल. उद्योजक, उद्योगांमधील माहिती तंत्रज्ञान अधिकारी, महाविद्यालयीन शिक्षक या सर्वांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल. शिबिरात सहभागी होण्यासाठी www.mcciapune.com या संकेतस्थळावर नावनोंदणी करता येईल, अशी माहिती एमसीसीआयएने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.