जाहिरात कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण; माजी नगरसेवकांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात कंपनीच्या अधिकाऱ्याला
मारहाण; माजी नगरसेवकांवर गुन्हा
जाहिरात कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण; माजी नगरसेवकांवर गुन्हा

जाहिरात कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण; माजी नगरसेवकांवर गुन्हा

sakal_logo
By

पुणे : जाहिरात कंपनीची परवानगी न घेता कंपनीच्या जाहिरात फलकावर वाढदिवसाची जाहिरातबाजी करणे माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्या अंगलट आले आहे. जाहिरात फलकाचा वापर केल्याने त्याचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या जाहिरात कंपनीतील अधिकाऱ्याला मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी नगरसेवक पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जाहिरात कंपनीचे अधिकारी अतुल माधव संगमनेरकर (वय ५५, रा. रास्ता पेठ) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर या प्रकरणी हाजी गफूर पठाण (वय ४५, रा. कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिठानगर येथील अशोक म्युज सोसायटीच्या परिसरातील चौकात शनिवारी (ता.२९) ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेरकर कॅप्शन आउटडोअर ॲडव्हरटायजिंग या कंपनीत अधिकारी आहेत. कंपनीचे कोंढवा परिसरातील जाहिरात फलकावर हाजी गफूर पठाण यांनी परवानगी न घेता स्वत:च्या वाढदिवसाचे फलक लावले होते. त्यानंतर कंपनीने पठाण यांच्या कार्यालयात जाहिरातीचे बिल पाठविले होते. बिलाच्या रकमेसाठी संगमनेरकर पठाण यांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा पठाण यांनी संगमनेरकर यांना शिवीगाळ करून लाथ मारली. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलिस निरीक्षक शिळीमकर तपास करत आहेत.