ज्येष्ठाला पावणेसहा लाखांचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठाला पावणेसहा लाखांचा गंडा
ज्येष्ठाला पावणेसहा लाखांचा गंडा

ज्येष्ठाला पावणेसहा लाखांचा गंडा

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : एटीएममधून रोकड काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचा बहाणा करून चोरट्याने पावणेसहा लाख रुपयांना गंडा घातला आहे. चोरट्याने ज्येष्ठाचे डेबिट कार्ड आणि पिनकोड चोरुन त्याआधारे वेळोवेळी पैसे काढून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या बाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे शनिवार पेठेत राहायला आहेत. ११ ऑक्टोबर रोजी फिर्यादी बाजीराव रस्त्यावरील एका बँकेच्या एटीएम केंद्रात रोकड काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी चोरटा एटीएम केंद्राच्या परिसरात थांबला होता. फिर्यादी एटीएममधून पैसे काढत असता चोरटा एटीएम केंद्रात आला आणि त्याने मदत करण्याचा बहाणा केला. चोरट्याने हातचलाखीने फिर्यादींचे डेबिट कार्ड चोरले. त्याऐवजी त्यांना दुसरे डेबिट कार्ड दिले. तसेच फिर्यादी यांच्याकडून कार्डचा पिन नंबरदेखील घेतला. ज्येष्ठ नागरिकाचे चोरलेले डेबिट कार्ड आणि पिन नंबरचा गैरवापर करून चोरट्याने गेल्या दहा ते बारा दिवसांत वेळोवेळी बँक खात्यातून पाच लाख ७९ हजार रुपये लांबविले. बँक खात्यातून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.