ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्यास अटक
ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्यास अटक

ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्यास अटक

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : कात्रज भागात ज्येष्ठ महिलेचे चार तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे चोरट्याचा माग काढून पकडण्यात आले. विशाल कामराज कांबळे (वय ३०, रा. पद्मावती) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला कात्रज भागातील नॅन्सी लेक होम सोसायटीच्या प्रवेशद्वाराच्या परिसरातून निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटा कांबळे ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील चार तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून पसार झाला. पोलिस कर्मचारी आशिष गायकवाड, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांनी चित्रीकरण पडताळले. कांबळेने ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर त्याला सापळा लावून पकडण्यात आले. सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, नरेंद्र महांगरे, शैलेंद्र साठे, रवींद्र चिप्पा, सचिन गाडे आदींनी ही कारवाई केली.