वीणा गवाणकरांशी संवादाचा कार्यक्रम मंगळवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीणा गवाणकरांशी संवादाचा कार्यक्रम मंगळवारी
वीणा गवाणकरांशी संवादाचा कार्यक्रम मंगळवारी

वीणा गवाणकरांशी संवादाचा कार्यक्रम मंगळवारी

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : चरित्रकार वीणा गवाणकर यांच्याशी मुक्त संवाद कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (ता. १) संध्याकाळी ६ वाजता टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे करण्यात आले आहे. अक्षरधारा, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेसतर्फे ५९८ व्या ग्रंथ प्रदर्शनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम विनामू्ल्य खुला असून डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. यानिमित्ताने गवाणकर यांनी लिहिलेल्या ‘एक होता कार्व्हर’, ‘डॉ. आयडा स्कडर’, ‘डॉ. खानखोजे’, ‘गोल्डा’, ‘भगीरथाचे वारस’ आणि अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘अवघा देहची वृक्ष जाहला’ या पुस्तकांविषयी प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळणार आहे.