नगर रस्ता परिसरात १४ लाखांचा गुटखा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगर रस्ता परिसरात १४ लाखांचा गुटखा जप्त
नगर रस्ता परिसरात १४ लाखांचा गुटखा जप्त

नगर रस्ता परिसरात १४ लाखांचा गुटखा जप्त

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १३ लाख ८७ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. येरवडामधील शास्त्रीनगर चौकात ही कारवाई करण्यात आली.
सवाराम लाथूराम देवासी (वय ३९, सध्या रा. कोंढवा, मूळ रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. देवासी कोंढवा भागातून गुटखा घेऊन नगर रस्त्यावरून वाघोलीकडे निघाला होता. येरवड्यातील शास्त्रीनगर चौकातून गुटखा वाहतूक करणारा टेम्पो निघाल्याची माहिती येरवडा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र आळेकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो अडवला. टेम्पोची पाहणी केली असता त्यात गुटख्याचे पुडे आढळून आले. या कारवार्इत पोलिसांनी १३ लाख ८७ हजार ८८० रुपयांचा गुटखा जप्त केला. येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र आळेकर, एकनाथ जोशी, सोमनाथ भोरडे, आनंदा भोसले आदींनी ही कारवाई केली.