सीएसआयआर नेटचा निकाल जाहीर एक लाख ६२ हजार उमेदवारांची प्रतिक्षा संपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीएसआयआर 
नेटचा निकाल जाहीर 

एक लाख ६२ हजार उमेदवारांची प्रतिक्षा संपली
सीएसआयआर नेटचा निकाल जाहीर एक लाख ६२ हजार उमेदवारांची प्रतिक्षा संपली

सीएसआयआर नेटचा निकाल जाहीर एक लाख ६२ हजार उमेदवारांची प्रतिक्षा संपली

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः विज्ञान शाखेतील प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी आणि संशोधन शिष्यृत्तीसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात सीएसआयआर-नेटचा निकाल घोषित करण्यात आला. देशभरातील सुमारे एक लाख ६२ हजार उमेदवारांनी सप्टेंबर २०२२ मध्ये ही परीक्षा दिली होती. सीएसआयआर आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जून २०२२ च्या सत्राची ही परीक्षा होती.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) वतीने राष्ट्रीय परीक्षा एजेंसीच्या माध्यमातून देशभरातील १६६ शहरांत ही परीक्षा पार पडली होती. सुमारे दोन लाख २१ हजार अर्जदारांपैकी प्रत्यक्ष एक लाख ६२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात सर्वाधिक विद्यार्थी हे जीवन विज्ञानाशी निगडीत होते. तर तब्बल एक लाख २० हजार विद्यार्थी कनिष्ठ संशोधक शिष्यवृत्तीसाठी इच्छुक होते. उमेदवारांना https://csirnet.nta.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहायला मिळेल.