मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मौजमजेसाठी दुचाकी 
चोरणाऱ्या तरुणाला अटक
मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला अटक

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला अटक

sakal_logo
By

पुणे : शहर परिसरातून दुचाकी चोरून त्यांच्या विक्रीतून आलेल्या पैशांचा वापर मौजमजेसाठी करणाऱ्या एका तरुणास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. चोरी केलेल्या पाच दुचाकी या तरुणाकडून जप्त केल्या आहेत. चोरट्याने भारती विद्यापीठ, हडपसर, शिक्रापूर परिसरातून दुचाकी चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शेखर चंद्रकांत चव्हाण (वय ३४, रा. हरणी, ता. पुरंदर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. आंबेगाव परिसरातील लिपाणे वस्ती भागात एक जण थांबला असून त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती पोलिस कर्मचारी हर्षल शिंदे आणि धनाजी धोत्रे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून चव्हाणला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडे असलेली बुलेट चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत चव्हाणने पुणे शहर तसेच परिसरातून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चव्हाण याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. चव्हाण याच्या विरोधात यापूर्वी दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल रसाळ, धीरज गुप्ता, रवींद्र चिप्पा, अवधूत जमदाडे, सचिन सरपाले, नीतेश खैरमोडे, राहुल तांबे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमले, विक्रम सावंत आदींनी ही कारवाई केली.