कर्नाटकातील एसटी वाहकाची तिकीट पेटी लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्नाटकातील एसटी 
वाहकाची तिकीट पेटी लंपास
कर्नाटकातील एसटी वाहकाची तिकीट पेटी लंपास

कर्नाटकातील एसटी वाहकाची तिकीट पेटी लंपास

sakal_logo
By

पुणे : कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसमध्ये ठेवलेली एसटी वाहकाची तिकिटांची पेटी चोरट्यांनी लांबवली. शंकरशेठ रस्त्यावर शनिवारी (ता. २९) ही घटना घडली. याबाबत शिवशरणप्पा हंगरगी (वय ५७, रा. काजी कॉलनी, बिदर, कर्नाटक) यांनी या खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंगरगी कर्नाटक परिवहन महामंडळात वाहक आहेत. शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकात (सेव्हन लव्हज् चौक) बस लावण्यात आली होती. चोरट्यांनी तिकीट काढण्याचे यंत्र, तिकीट पेटी असा मुद्देमाल लांबविला. पेटीतील कागदी तिकिटांची किंमत ३५ हजार ३०० रुपये असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.