पुण्याचा पारा किमान १२.६ अंश सेल्सिअस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्याचा पारा किमान
१२.६ अंश सेल्सिअस
पुण्याचा पारा किमान १२.६ अंश सेल्सिअस

पुण्याचा पारा किमान १२.६ अंश सेल्सिअस

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः पुणे शहरात गेल्या आठवड्याभरापासून किमान तापमानाचा पारा सातत्याने खाली येत आहे. किमान व कमाल तापमानात सरासरीपेक्षा होणारी घट यामुळे गारठा अधिकच जाणवू लागला आहे. तर रविवारी (ता. ३०) शहरात १२.६ अंश सेल्सिअस किमाल तापमान नोंदले गेले. सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात ३ अंशांनी घट झाली होती. रविवारी नोंदले गेलेले शहरातील नीचांकी तापमान हे गेल्या दहा वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील दुसरे सर्वाधिक किमान तापमान ठरले. यापूर्वी २०१६ मध्ये १२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले होते. गारठ्याची स्थिती पुणे शहर व परिसरात अशीच कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
मॉन्सून बाहेर पडल्यानंतर प्रथमच शहरातील किमान तापमान इतके कमी नोंदले गेले आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरात निरभ्र आणि कोरडे वातावरण असल्यामुळे किमान तापमानात ही घट होत आहे. पावसाळा संपताच थंडीची सुरवात झाली असून छत्री आणि रेनकोटची जागा आता स्वेटर, जॅकेटने घेतली आहे. असे असले तरी कडाक्याच्या थंडीसाठी अद्याप प्रतिक्षा करावी लागणार आहे. सध्या नीचांकी तापमान हे दोन अंकी असून अद्याप १० अंशाच्या खाली तापमान गेले नाही.
शहरात पहाटे पहाटे व्यायामासाठी बाहेर पडणारे नागरिक थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जॅकेट आणि स्वेटरचा वापर करताना दिसू लागले आहे. पहाटे गारवा, दुपारी ऊन आणि रात्री पुन्हा गारठ्याची अनुभूती सध्या पुणेकरांना होत आहे. हे चित्र पुढील तीन चार दिवस असेच कायम राहण्याची शक्यता आहे. तर या कालावधीत शहरात किमान तापमानाचा पारा ही १५ अंशांच्या खाली राहू शकतो. जिल्ह्यातील इतर भागात ही किमान तापमान १५ ते १७ अंशांच्या जवळपास नोंदले जाण्याची शक्यता आहे.