शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेतंर्गत १८० कोटी जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांच्या खात्यावर 
योजनेतंर्गत १८० कोटी जमा
शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेतंर्गत १८० कोटी जमा

शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेतंर्गत १८० कोटी जमा

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत असलेल्या ‘प्रोत्साहनपर लाभ योजने’ च्या पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील ४७ हजार ३७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सुमारे १८१ कोटी २६ लाख रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.

२०१७ ते २०२० या कालावधीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुणे जिल्ह्यात प्रोत्साहनपर लाभाच्या घोषित पहिल्या टप्प्यातील यादीत एकूण ५८ हजार ४४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी ५५ हजार ४७८ शेतकऱ्यांचे म्हणजे ९५.५८ टक्क्यांइतके आधार प्रमाणिकरण पूर्ण झालेले होते. जिल्ह्यातील आधार प्रमाणिकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांमध्ये केवळ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील (पीडीसीसी) कर्जखातेधारक शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यामध्ये ४० हजार ३०० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १७२ कोटी ४८ लाख ८० हजार ८९५ रुपयांइतकी प्रोत्साहनपर लाभाची रक्कम जमा झालेली आहे, असे जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी सांगितले.