पुणे- नाशिक विमानसेवेविषयी संभ्रमावस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे- नाशिक विमानसेवेविषयी संभ्रमावस्था
पुणे- नाशिक विमानसेवेविषयी संभ्रमावस्था

पुणे- नाशिक विमानसेवेविषयी संभ्रमावस्था

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः पुणे विमानतळावरून ‘उडान’ योजनेतून सुरु झालेली पुणे - नाशिक विमानसेवा बंद झाल्यानंतर ती सिस्टीममधून वगळण्यात आली आहे. परिणामी प्रवाशांना तिकीट मिळत नाही. ही परिस्थिती असताना विमानतळ प्रशासनाने ही सेवा सुरु होणार असल्याचे म्हटले आहे, मात्र याबाबतची कोणतीही अधिकची माहिती विमानतळ प्रशासन देत नाही. त्यामुळे प्रवाशांची संभ्रमावस्था वाढली आहे.

पुणे विमानतळाच्या विंटर शेड्यूलला रविवारपासून सुरवात झाली. यात नाशिकसाठी विमानसेवा सुरु होणार असल्याचे म्हटले आहे, मात्र प्रवाशांनी तिकीट काढण्याचा प्रयत्न केला असता सेवा बंद असल्याचा सांगण्यात आले. दरम्यान, नाशिक (ओझर ) येथील विमानतळ २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान धावपट्टीच्या कामासाठी १३ दिवस बंद केले जाणार आहे. यावेळी काही विमाने शिर्डी व पुणे विमानतळावर उतरण्याची शक्यता आहे.
पुण्याहून गोव्यासाठी सद्या डाबोलीम विमानतळावर विमानसेवा सुरु आहे. विंटर शेड्यूलमध्ये मोपासाठी देखील विमानसेवा सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र सध्या तरी या विमानतळाचे काम सुरु आहे.

पुणे - नाशिक विमानाचे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला तर ही सेवा सिस्टीममध्ये वगळण्यात आल्याचे दिसते. जर या सेवेचा पुन्हा ‘उडान’मध्ये समावेश केला असेल तर त्याची माहिती प्रशासनाने द्यावी. प्रवाशांमध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर होणे गरजेचे आहे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ.
---
पुणे - नाशिक विमानसेवा सुरु होणार आहे, मात्र ती कधी सुरु होईल याबाबत आताच काही सांगता येणार नाही. मात्र त्यासाठी पुणे विमानतळावर स्लॉट उपलब्ध केला आहे.
-संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे (लोहगाव ) विमानतळ.