‘ख्याल गायकी नवनिर्मितीला वाव देते’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ख्याल गायकी नवनिर्मितीला वाव देते’
‘ख्याल गायकी नवनिर्मितीला वाव देते’

‘ख्याल गायकी नवनिर्मितीला वाव देते’

sakal_logo
By

‘ऋत्विक’तर्फे
‘ख्याल विमर्श’
पुणे ः ‘‘भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी हा लोकप्रिय प्रकार असला, तरी कलाकारांसाठी तो साधनेचा विषय आहे. विलंबित (मोठा ख्याल) व द्रुत (छोटा ख्याल) अशा दोन प्रकारातील ख्याल गायकी उत्स्फूर्त बांधणी व नवनिर्मितीला वाव देते’’, असे मत ज्येष्ठ गायक व संगीततज्ज्ञ पं. सत्यशील देशपांडे यांनी नुकतेच व्यक्त केले. ऋत्विक फाउंडेशनतर्फे आयोजित ‘ख्याल विमर्श’ या विशेष कार्यक्रमात पं. देशपांडे बोलत होते. याप्रसंगी फाउंडेशनचे प्रवीण कडले, चेतना कडले उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध मुखड्यांचे सादरीकरण करत त्यातील बारकावे, तुकडे, आवर्तन, ताल, राग, बोल असे अनेक प्रकार समजावून सांगितले. ‘आधा हैं चंद्रमा, रात हैं आधी’, ‘कजरा रे कजरा रे’ अशा लोकप्रिय गाण्यांचे मुखडे अनुक्रमे एकताल व तीन ताल या शास्त्रीय तालांमध्ये आणून नवनिर्मितीला व वैयक्तिक अभिव्यक्तीला कसा वाव मिळतो हे सप्रयोग दाखवले व याच मुखड्यांच्या वैविध्यपूर्ण सादरीकरणाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सृजन देशपांडे यांनी सहगायन, तर विभाव खंडोलकर यांनी तबल्यावर साथ संगत केली.