पती पत्नीच्या वादात लहान भावावर कोयत्याने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पती पत्नीच्या वादात 
लहान भावावर कोयत्याने वार
पती पत्नीच्या वादात लहान भावावर कोयत्याने वार

पती पत्नीच्या वादात लहान भावावर कोयत्याने वार

sakal_logo
By

पुणे : कौटुंबिक कारणातून सरार्इत गुन्हेगार आणि त्याच्या पत्नीसोबत सुरू असलेल्या वादात मध्यस्ती केली म्हणून सरार्इत गुन्हेगाराने त्याच्या लहान भावावर कोयत्याने वार केला. मोठ्या भावाने केलेल्या या हल्ल्‍यात छोटा भाऊ जखमी झाला आहे. हा प्रकार हॅपी कॉलनीतील शनिवारी (ता. २९) रात्री साडेअकरा वाजता घडला.
रवी श्याम वाघमारे (वय ३०, रा. हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरूड) असे वार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. अलंकार पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या प्रकरणी सचिन श्याम वाघमारे (वय २१, रा. हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरूड) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी रवी आणि फिर्यादी सचिन हे भाऊ आहेत. रवी सराईत गुन्हेगार आहे. तो साथीदारांसह घातक शस्त्रे बाळगून गंभीर गुन्हे करत असतो. त्यामुळे पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी त्याला ऑगस्ट २०२१ मध्ये एक वर्षासाठी तडीपार केले होते. तडीपारीची मुदत संपल्यानंतर तो तीन महिन्यांपूर्वी शहरात आला. शनिवारी रात्री त्याचे पत्नीसोबत भांडण झाले. तेव्हा लहान भाऊ सचिन यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावरून दोघा भावांत वाद झाला. त्यामुळे रवी याने रागाच्या भरात घरात लपवून ठेवलेला कोयता काढून सचिनच्या हातावर मारला. तसेच शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.