विद्युत दाहिनीसाठी जागेची चाचपणी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभाग प्रयत्नशील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युत दाहिनीसाठी जागेची चाचपणी
महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभाग प्रयत्नशील
विद्युत दाहिनीसाठी जागेची चाचपणी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभाग प्रयत्नशील

विद्युत दाहिनीसाठी जागेची चाचपणी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभाग प्रयत्नशील

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३१ ः महापालिका क्षेत्रात मृत जनावरांना पुरण्यासाठी दफनभूमी, स्मशानभूमीची पुरेशी जागा नाही. त्यामुळे मृत जनावरांसाठी विद्युतदाहिनी उपलब्ध करण्याची मागणी केली जात आहे. त्यानुसार महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाकडून जागेची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेने भोसरी बालाजीनगरमध्ये सात एकर परिसरात दफनभूमी सुरू केली आहे. सध्या या ठिकाणी गाय, बैल, म्हैस, उंट, गाढव, घोडे अशा ४०० दफन केलेल्या जनावरांची संख्या आहे. शहरातील काही ग्रामीण भागात गाय- म्हशी पाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. घोडे, गाढव, बैलही पाळले जातात. त्यामुळे काही वेळा मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह उघड्यावर टाकले आहेत. याबाबत तक्रारी वाढल्यावर महापालिकेने ठेका दिलेली संस्था दफन करण्याचे काम करते पण त्यात हलगर्जीपणा होत आहे. दुभती म्हैस मेल्यावरही ती महापालिकेने उचलून न्यावी, यासाठी प्रयत्न होतो. काहीजण उंट आणून त्याच्या सवारीवर पैसा कमावतात. मात्र, ते मृत झाल्यावर पसार होतात. अशाप्रकारे शहरात मृत जनावरांच्या दफनविधीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे

गाय- म्हैस मृत झाल्यावर लोकप्रतिनिधींचे महापालिकेला फोन येतात. त्यांचे दफन कुठे करायचे ? असा प्रश्‍न कर्मचाऱ्यांनी केल्यास ते तुम्हीच ठरवा. आमच्या भागात पुरायचे नाही, असा दम दिला जातो. महापालिकेने सद्य:स्थितीत मृत जनावरे पुरण्यासाठी अधिकची जागा आरक्षित केलेली नाही. कुत्रा वा अन्य छोटे प्राणी कुठेही पुरता येतात. पण, मोठे प्राणी पुरताना मोठी पंचायत होते. मृत जनावरांची विल्हेवाट महापालिकेने लावावी, असा कायदा आहे. पण ती विल्हेवाट कशी लावावी, हे सांगितले नसल्याने प्रश्न जटिल होत आहे

कोट
शहरात कुत्रा आणि मांजर या प्राण्यांसाठी नेहरूनगर येथे विद्युत दाहिनी आहे. याठिकाणी दररोज ८ ते १० लहान मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, ही दाहिनी नादुरूस्त झाली तर पुण्यात जावे लागते. त्यामुळे नेहरूनगर येथे लहान प्राण्यांसाठी आणखी एक सेट उभारण्यात येणार आहे. तसेच पाळीव मोठ्या प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनी उभारण्यासाठी जागेची चाचपणी सुरू आहे.
– सचिन ढोले, उपायुक्त पशू वैद्यकीय विभाग