कोथरूडमधील येनपुरे टोळीवर मोक्का कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोथरूडमधील येनपुरे टोळीवर मोक्का कारवाई
कोथरूडमधील येनपुरे टोळीवर मोक्का कारवाई

कोथरूडमधील येनपुरे टोळीवर मोक्का कारवाई

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : कोथरूडमधील केळेवाडी परिसरात दहशत माजविणारा गुंड सागर येनपुरे आणि त्याच्या साथीदारांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. सागर ऊर्फ मांडी येनपुरे, साहिल जगताप, अक्षय वाळुंज, सुरेश वाजे आणि वैभव ऊर्फ भोऱ्या जगताप (सर्व रा. केळेवाडी, पौड रस्ता, कोथरूड) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत.

येनपुरे, त्याचे साथीदार, जगताप, वाळुंज, वाजे यांनी पौड रस्त्यावरील केळेवाडी परिसरात दहशत माजविली होती. त्यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दहशत माजविणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. येनपुरे टोळीच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर आरोपींच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे, उपनिरीक्षक तानाजी पांढरे, प्रवीण कुलकर्णी, अजय सावंत यांनी मोक्का कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे पाठविण्यात आला. प्रस्तावाची पडताळणी करून पोलिस आयुक्तांनी येनपुरे टोळीच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले.