वृद्ध महिलेला रेल्वे कर्मचाऱ्यांची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृद्ध महिलेला रेल्वे कर्मचाऱ्यांची मदत
वृद्ध महिलेला रेल्वे कर्मचाऱ्यांची मदत

वृद्ध महिलेला रेल्वे कर्मचाऱ्यांची मदत

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ ः पुणे रेल्वे स्थानकावर उतरलेल्या महिला प्रवाशाच्या सामानाची चोरी झाल्यानंतर त्यांना स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात दिला. यातून माणुसकीचे दर्शन घडले. त्यांना आर्थिक मदत तर केलीच शिवाय वाराणसी येथील घरी जाण्यासाठी देखील आरक्षित तिकीट काढून देण्यात आले. महिलेने रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
पुणे स्थानकावर कार्यरत असणाऱ्या उपस्थानक व्यवस्थापक अनिलकुमार तिवारी यांना गार्ड विल्यम यांनी फलाट चारवर एक वृद्ध महिला रडत असल्याचे सांगितले. तिवारी यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यावेळी प्रवासात त्यांची बॅग चोरीला गेले असल्याचे समजले. बॅगेत रोख रक्कम, महत्त्वाचे कागदपत्रे आदी होते. घरगुती वादातून ती महिला वाराणसी येथून पुण्याला आली होती. आरपीएफचे निरीक्षक बी. एस. रघुवंशी यांच्यासह काही सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन महिलेला पाच दिवस अपना घर येथे पाच दिवस ठेवले. त्या नंतर त्याला महिलेला रोख रक्कम व आरक्षित तिकीट देऊन पुण्याहून वाराणसी रेल्वेने त्यांच्या मुलांसोबत पाठविण्यात आले. कर्मचाऱ्यांचे आभार मानत त्या महिलेने पुण्याचा निरोप घेतला.