आबालवृद्धांनी लुटला ‘दिवाळी संध्या’चा आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आबालवृद्धांनी लुटला ‘दिवाळी संध्या’चा आनंद
आबालवृद्धांनी लुटला ‘दिवाळी संध्या’चा आनंद

आबालवृद्धांनी लुटला ‘दिवाळी संध्या’चा आनंद

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ ः ‘सूर तेच छेडीता...’, ‘आम्ही ठाकर ठाकर...’, ‘अश्विनी ये ना...’, ‘वल्हव रे नाखवा हो...’, ‘सैराट झालं जी...’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली...’ अशा जुन्या आणि नव्या मराठी गीतांचे मिश्रण असलेल्या संगीत मैफलीचा रसिकांनी आनंद घेतला. निमित्त होते, आधार सेवा फाउंडेशनतर्फे दिवाळी संध्या संगीत महोत्सवाचे.
दोन दिवस रंगलेल्या या दिवाळी संध्याचा प्रारंभ माजी आमदार उल्हास पवार, वरिष्ठ पोलिस निरिक्षक अभय महाजन, माजी उपमहापौर आबा बागूल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. यावेळी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागूल, आयोजक हेमंत बागूल, श्रुतिका बागूल, घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे आदी उपस्थित होते. यावेळी जितेंद्र भुरूक आणि सहकाऱ्यांनी ‘सूर तेच छेडीता’ हा कार्यक्रम सादर केला. तर, दुसऱ्या दिवसी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अभिवादन करणारा ‘लतायुग’ हा विशेष कार्यक्रम सादर झाला. संदीप पंचवाटकर निर्मित या कार्यक्रमात रेशमी मुखर्जी, गफार मोमीन, राजेश्वरी पवार, विवेक पांडे, कल्याणी देशपांडे आदींनी लता दीदींची अजरामर गीते सादर केली.