पुण्यात तापमानात किंचित चढ-उतार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात तापमानात
किंचित चढ-उतार
पुण्यात तापमानात किंचित चढ-उतार

पुण्यात तापमानात किंचित चढ-उतार

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ ः पुणे शहरात किमान तापमानात किंचित चढ-उतार पाहायला मिळत असली तरी सरासरीच्या तुलनेत मात्र किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट कायम आहे. शहरात सोमवारी १३.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. दरम्यान पुढील आठवडाभर ही स्थिती अशीच कायम राहण्‍याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
पुणे शहरात रविवारी (ता. ३०) किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या घरात होता. ही नोंद यंदाच्या ऑक्टोबर महिन्यातील सर्वांत नीचांकी तापमानाची ठरली. भल्या पहाटे व रात्री जाणवणारा गारठा आणि दिवसा उन्हाचे चटके अशी अनुभूती पुणेकरांना सध्या होत आहे. शहर व परिसरात पुढील आठवडाभर किमान तापमान १४ ते १८ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले जाऊ शकते.
राज्यातही गारठा वाढू लागला असून किमान व कमाल तापमानातील चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सध्या नैॡत्य बंगालच्या उपसागरात उत्तर श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून या प्रणालीपासून केरळ ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यात दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाची स्थिती असली तरी राज्यात मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता कायम आहे. राज्यात सोमवारी नीचांकी तापमानाची नोंद औरंगाबाद येथे १३.३ अंश सेल्सिअस इतकी झाली. तर कोकणात मात्र किमान तापमान हे २० अंशांच्या घरात नोंदले गेले.