धायरी भागात जड वाहनांना बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धायरी भागात जड वाहनांना बंदी
धायरी भागात जड वाहनांना बंदी

धायरी भागात जड वाहनांना बंदी

sakal_logo
By

पुणे, ता. १ : सिंहगड रस्ता भागातील धायरी परिसरात बेनकर वस्ती ते काळूबाई मंदिर चौक दरम्यान सकाळी आठ ते अकरा तसेच सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश वाहतूक पोलिस आयुक्त राहुल श्रीरामे यांनी दिले आहेत.

धायरीतील बेनकर वस्ती ते काळूबाई मंदिर चौक दरम्यानचा रस्ता गजबजलेला आहे. या भागात जड वाहनांमुळे कोंडी तसेच अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या भागात सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत अवजड वाहनांना बंदी घातली आहे. दरम्यान, कोंढवा भागातील सहा रस्त्यांवर सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

जड वाहनांसाठी बंदी घातलेले रस्ते पुढीलप्रमाणे
- येसाजी कामठे चौक ते कोंढवा बुद्रुककडे जाणारा रस्ता
- सोमजी चौकाकडून कोंढवा बुद्रुककडे जाणारा रस्ता
- कात्रज-कोंढवा रस्त्यावरील भोलेनाथ मंडळ चौकातून कोंढवा बुद्रुककडे जाणारा रस्ता
- कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या कार्यालयाकडून कोंढवा बुद्रुककडे जाणारा रस्ता
- टिळेकरनगर चौकातून कोंढवा बुद्रुककडे जाणारा रस्ता
- कात्रज-कोंढवा रस्ता ते व्हीआयटी महाविद्यालय रस्ता परिसरातील शांतिबन सोसायटी परिसर