उद्योगासंबंधी आज आंतरराष्ट्रीय परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योगासंबंधी आज
आंतरराष्ट्रीय परिषद
उद्योगासंबंधी आज आंतरराष्ट्रीय परिषद

उद्योगासंबंधी आज आंतरराष्ट्रीय परिषद

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः उद्योगांसाठी लागणारे अॅडव्हान्स मटेरिअल आणि बहुवारीकांसंबंधीची आंतरराष्ट्रीय परिषद पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. बुधवारी (ता. २) सुरू होणाऱ्या या परिषदेला रेण्वीय जीवशास्रातील नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ प्रा. सर रिचर्ड जे. रॉबर्ट्स हे उपस्थित असणार आहे.
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी ऑफ पॉलिमर्स अॅण्ड अॅडव्हान्स मटेरिअल्स टेक्नॉलॉजी थ्रू इनोव्हेशन, अथ्रप्योनरशीप अॅण्ड इंडस्ट्री ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. तीन दिवसीय परिषदेसाठी द सोसायटी ऑफ पॉलिमर सायन्स आणि एनसीएल रिसर्च फाउंडेशनच विशेष साहाय्य आहे.

‘पॉलिमर’वर चर्चा
दोन वर्षांतून एकदा होणाऱ्या या परिषदेसाठी जगभरातील पॉलिमर संशोधक, प्रसिद्ध शास्रज्ञ आणि शिक्षण क्षेत्रातील दिग्गज सहभागी होतात. पॉलिमर उद्योगांतील नव्या संधी आणि उत्पादनांबद्दल उद्योग जगतातील धुरिणांशीही यावेळी चर्चा करण्यात येते.

‘एनसीसीएस’मध्ये विशेष व्याख्यान
भारत दौऱ्यावर असलेले प्रा. सर रिचर्ड पुण्यातील व्याख्यानात आपल्या नोबेल पारितोषिक विजयाचा प्रवास उलगडणार आहे. राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेत या निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. २) सकाळी ११.४५ वाजता सुरू होणाऱ्या व्याख्यानाचे https://webcast.unipune.ac.in/NCCS/ या संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.