विद्रोही साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्रोही साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन
विद्रोही साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन

विद्रोही साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन

sakal_logo
By

विद्रोही साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन
पुणे, ता. १ ः यंदा पुण्यात होत असलेल्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या कार्यालयाचे नुकतेच अनोख्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. बळीराजाच्या उपस्थितीत पालक संघाचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल करीम अत्तार यांच्या हस्ते ज्ञानज्योत प्रज्वलित करून उद्घाटन झाले. दांडेकर पुलाजवळील साने गुरुजी स्मारक येथे दररोज सायंकाळी हे कार्यालय कार्यरत असेल. या वेळी अत्तार, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक सदस्य धनाजी गुरव, बळीराजाचा वेश धारण करणारे रघुनाथ ढोक यांनी मनोगत व्यक्त केले. संमेलनाच्या स्वागत समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. या प्रसंगी मानव कांबळे, ॲड. झाकीर अत्तार, राकेश नेवासकर, अंनिसचे पदाधिकारी श्रीपाद ललवाणी, भारतीय साम्यवादी पक्षाचे अरविंद जक्का, ॲड. मोहन वाडेकर, नीरजकुमार कडू आदी उपस्थित होते.
---------
डॉ. पं. कपोते यांची संचालकपदी नियुक्ती
पुणे, ता. १ ः डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स या विभागाचे संचालक म्हणून विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी ज्येष्ठ कथक नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांची नियुक्ती केली. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते डॉ. कपोते यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी डॉ. नरेंद्र कडू उपस्थित होते. डॉ. कपोते यांनी २००५ साली कथक नृत्यात पी.एचडी प्राप्त केली आहे. ते ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, श्री श्री युनिव्हर्सिटी कटक, श्री छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी पनवेल आदी ठिकाणी नृत्यविषयात मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
-----------
सुपर्णा नाईक यांना
‘दिवा उत्कृष्टता पुरस्कार’
पुणे, ता. १ ः भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन, पुणे येथे कार्यरत असलेल्या अधिव्याख्याता सुपर्णा नाईक यांना ज्योतिषशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘दिवा उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या यशाबद्दल प्राचार्य राजेंद्र उत्तुरकर यांनी संस्थेच्या वतीने नाईक यांचे अभिनंदन केले.
---------
मोफत वाचनालयाचे उद्घाटन
पुणे, ता. १ ः बावधन बुद्रुक परिसरातील पेबल्स २ या गृहनिर्माण संकुलात ‘पेबल्स २ वाचनालय’ या मोफत वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. लेखिका-अभिनेत्री शोभा बोंद्रे, लेखिका प्रियंका चौधरी आणि उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अभिषेक अवचार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रसंगी पूनम शर्मा, हेमंत मुजुमदार, तुषार खोपडे तसेच संकुलातील रहिवासी उपस्थित होते. हे वाचनालय सुरु करण्यासाठी येथील रहिवाशांनी आर्थिक तसेच पुस्तके आणि इतर साहित्य देणगी स्वरूपात देऊन मदत केली. ही संकल्पना रुजवण्यासाठी अर्पित व भाग्यश्री बडवाईक यांनी तसेच ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी गीतांजली हट्टंगडी, माधवी विसाळ, नचिकेत देशपांडे, वंदना जोशी, आसावरी गोडसे, आरती देशपांडे, स्वाती सुर्वे, नितीन अटकेकर, नंदकुमार शेटे, रमेश सांगारे, जयराज मुळे, श्रीनिवास गडकरी आदींनी प्रयत्न केले.