ऑटोरिक्षा मीटर कॅलिब्रेशनसाठी मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑटोरिक्षा मीटर कॅलिब्रेशनसाठी मुदतवाढ
ऑटोरिक्षा मीटर कॅलिब्रेशनसाठी मुदतवाढ

ऑटोरिक्षा मीटर कॅलिब्रेशनसाठी मुदतवाढ

sakal_logo
By

पुणे, ता. १ : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांसाठी खटुआ समितीच्या शिफारशीनुसार १ सप्टेंबर २०२२ पासून भाडेवाढ लागू केलेली आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोरिक्षांचे मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑटोरिक्षाधारकांनी त्यांच्या भाडेमीटरचे कॅलिब्रेशन आणि मीटर तपासणीचे काम मुदतीत केलेले नाही. तसेच, ऑटोरिक्षा संघटनांकडून ऑटोरिक्षा परवानाधारक, पालकांची गैरसोय टाळण्यासाठी मीटर कॅलिब्रेशनसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून मीटर कॅलिब्रेशन करण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. मुदतीत मीटर कॅलिब्रेशन करून न घेणाऱ्या ऑटोरिक्षाधारकांवर परवाना निलंबन किंवा तडजोड शुल्काची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.