जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकाराला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकाराला अटक
जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकाराला अटक

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकाराला अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १ : व्याजाने दिलेल्या एक लाख रुपयांच्या बदल्यात चार लाख ८६ हजार रुपये वसूल केल्यानंतरही ४० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकारासह त्याच्या हस्तकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवी नरसिंग पवार (वय ४२, रा. लक्ष्मीनगर, हडपसर) आणि त्याचा साथीदार अशोक वसंत ठाकरे (वय २७, रा. हडपसर) यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार यांनी याबाबत खंडणीविरोधी पथकाकडे अर्ज दाखल केला होता. त्याची चौकशी करून खंडणीविरोधी पथक दोनने (गुन्हे शाखा) ही कारवार्इ केली.

अर्जदार व त्यांचा मित्र या दोघांनी मिळून पवार याच्याकडून मे ते डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये एक लाख रुपये प्रति महिना १५ टक्के व्याजदराने घेतले होते. त्या एक लाख रुपयांच्या मोबदल्यात अर्जदार यांनी तीन लाख ३० हजार रुपये रोख स्वरूपात आणि एक लाख ५६ हजार ऑनलाइन असे एकूण चार लाख ८६ हजार रुपये दिले होते. मात्र त्यानंतरही आरोपींनी अर्जदार यांच्या मुलाला उचलून घेऊन जाऊन त्याचे हातपाय तोडून टाकण्याची व अर्जदार यांना जीवे ठार मारून टाकण्याची धमकी देऊन आणखी मुद्दल व व्याज अशी ४० हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे अर्जदार यांनी तक्रारअर्ज दिला होता.